जून महिन्यात 10 दिवस बँकांना (Bank Holiday) सुट्टी


ब्युरो टीम : आज जून महिना सुरु झाला असुन जर तुम्ही आपली बँकेत बाकी असलेली कामे या महिन्यात करण्यासाठी नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या महिन्यात एकूण दहा दिवस बँका बंद (June Month Bank Holiday) असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या या सुट्ट्या लक्षात घेऊन तुम्ही तुमचे नियोजन करा अन्यथा तुमची निराशा होऊ शकते.  

जून महिन्यात बँका एकूण दहा दिवस बंद आहेत. यात एकूण पाच रविवार आणि दोन शनिवार आहेत. बँकांना जून महिन्यातील पहिली सुट्टी ही दोन जून रोजी असेल. कारण दोन जूनला रविवार आहे. त्यानंतर 15 जून रोजी देशाच्या काही भागांत बँका बंद असतील. 17 जून रोजी बकरी ईद आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद असतील. जम्मू आणि श्रीनगर मध्ये बकरी ईदच्या निमित्ताने दोन दिवसांची सुट्टी असते. त्यामुळे तेथे 18 जून रोजीदेखील बँक बंद असणार आहे 

या काळात बँका बंद असल्या तरी ग्राहकांकडे ऑनलाईन बँकिंगचा पर्याय असणार आहे. ग्राहक नेट बँकिंग तसेच फोन बँकिंगच्या मदतीने आपले व्यवहार करू शकतात. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने