ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतील चौथ्या टप्प्याचा प्रचार शेवटच्या काही तांसावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे, उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांची लगबग व प्रचारासाठीचा जोर दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी अजित पवारांनी या मतदारसंघात सभा घेऊन एका आमदाराला सज्जद दमही दिला. त्यामुळे, ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली असून अभिनयावरुन डिवचणाऱ्या व चिडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिरुरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे मुख्यत्वे अभिनेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. तसेच, इतर चित्रपट व मालिकांमधूनही ते प्रेक्षकांचे चाहते अभिनेत आहेत. मात्र, राजकारणात आल्यानंतर, खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनयाचा संदर्भ देत टीका करण्यात आली. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारातही त्यांना याच मुद्द्यावरुन लक्ष्य केले जात आहे. एका अभिनेत्याला लोकसभा मतदारसघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार, असे म्हणत अजित पवार व पाटील यांच्याकडून लक्ष्य केलं जात आहे. मात्र, आता अमोल कोल्हेंनी या सर्व टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
5 वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक
खासदार कोल्हे यांनी आगामी 5 वर्षांसाठी मोठा निर्णय जाहीर केला. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. काही दिवसांसाठी नाही, तर 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईल. माझी शिरुरच्या जनतेसाठी ही कमिटमेंट आहे, असे म्हणत अमोल कोल्हें यांनी पुन्हा खासदार झाल्यास आपण 5 वर्षांसाठी अभिनय श्रेत्राला रामराम करत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले.
केवळ हा अपवाद राहिल
छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिले, त्यामुळे या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, अशा शब्दात अमोल कोल्हेंनी पुढील 5 वर्षांसाठीची भूमिका जाहीर केली.
टिप्पणी पोस्ट करा