ब्युरो टीम : बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूर याची बहिण अंशुला कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. अंशुला कपूर ही तशी बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील अंशुला कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अंशुला कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंशुला कपूर कायमच दिसते. अंशुला कपूर ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. नुकताच अंशुला कपूरचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
अंशुला कपूर ही सध्या विदेशात बॉयफ्रेंडसोबत धमाल करताना दिसतंय. अंशुला कपूर हिचे तेच फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे अंशुला कपूर ही बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक होताना देखील दिसत आहे. अंशुला कपूर ही गेल्या काही वर्षांपासून रोहन ठक्कर याला डेट करत आहे. कायमच अंशुला कपूरला रोहनसोबतचे खास फोटो शेअर करताना दिसते.
आता अंशुला कपूर ही रोहन ठक्कर याच्यासोबत थेट पॅरिसला गेलीये. पॅरिसमधील खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंशुला कपूर दिसलीये. हेच नाही तर थेट रोहन ठक्कर याचे किस घेताना देखील अंशुला कपूर दिसलीये. अंशुला कपूर ही पॅरिसमध्ये धमाल करताना दिसत आहे. अंशुला कपूरला नेहमीच फिरायला प्रचंड आवडते. नेहमीच ती फोटो शेअर करते.
अंशुला कपूर हिने पॅरिसमधील प्रसिद्ध स्थळांना भेट दिलीये. आता अंशुला कपूर हिच्या या फोटोंवर काका आणि काकू यांनी कमेंट केल्या आहेत. महीप कपूरने हार्टवाले इमोजी शेअर केले आहेत. यासोबतच संजय कपूरने देखील कमेंट केली आहे. आता अंशुला कपूरचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहतेही मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अंशुला कपूर हिने मोठा खुलासा केला. अंशुला कपूर हिने सांगितले होते की, आपल्याला गंभीर आजाराची लागण झाली. यामध्ये तिचे सतत वजन वाढत होते. अंशुला कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंशुला कपूर ही लवकरच रोहन ठक्कर याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा