ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. क्रांती चौकातून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याचवेळी महायुतीचे कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेचा इशारा
आमच्या मनसैनिकांच्या नादाला कोणी लागू नये. नाही तर यांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू… यांनी हात तोडण्याची भाषा करू नये यांना तर आम्ही पळून पळून मारलं आहे. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहे ही काय आम्हाला धमकी देणार?,असं म्हणत संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.
संजय राऊतांवर निशाणा
संजय राऊत यांनी भाजपचा प्रचार केला तेव्हा ते देशप्रेमी आणि आम्ही प्रचार केला की देशद्रोही…ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल घाणेरडी वक्तव्यं केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. संजय राऊत जेव्हा वर जातील, तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत. हे माझं वाक्य लिहून घ्या, असंही देशपांडे म्हणाले.
काँग्रेससारख्या देशद्रोह्यांसोबत जाऊन बसले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत आहे. बाळासाहेबांना जो त्रास होत आहे तो आमचा नाही यांचा होत आहे. मनसेची दखल घ्यावीशी वाटत नाही तर थोबाड कशाला उघडता मनसेच्या सभा पाहून हे घाबरले आहेत, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे.
पवारांवर टीका
जातीपातीचे राजकारण नेहमी शरद पवारांनी केलं आहे. वेळोवेळी शरद पवारांनीच भूमिका बदलली पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच होता. सत्तेसाठी दुसऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसणारे हे आहे.त्यांना भूमिका बदलणारे म्हणतात ते काम शरद पवारांनी केलं, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
टिप्पणी पोस्ट करा