काय सांगतो मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा एक्झिट पोल (Exit Poll)

 


    ब्युरो टीम : देशभरातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. 04 जून 2026 रोजी निकालाचे चित्र स्पष्ट होणार असले तरी विविध एक्झिट पोल (Exit Poll) देखील सोशल मिडीयाच्या मार्फत समोर येत आहेत. आता यातच राज्यातील एक्झिट पोलबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील एक दावा केला आहे.

    भुजबळांनी एक्झिट पोलवर महत्त्वाचं भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असा रंगतदार  सामना पाहायला मिळाला. आता विजयाबद्दल दावा करताना 'महायुतीच्या 45 जागा निवडून येतील, तर चुकून दोन-चार जागा महाविकास आघाडीला जातील', असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. 

    यावेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीकडून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष तर मविआकडून कॉंग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात मुख्य लढत आहे. या लोकसभा निवडणुकी बाबत भुजबळांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार का? हे येत्या 04 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने