Dinesh Kartik : टी 20 वर्ल्ड कपसाठी दिनेश दिनेश कार्तिकची निवड;आयसीसीने दिली मोठी जबाबदारी

 

ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. तर आरसीबीचं या पराभवासह या हंगामातील आव्हान इथेच संपुष्टात आलं. आरसीबीच्या या प्रवासासह दिग्गज विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक यानेही आपला आयपीएलचा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. सामन्यांनंतर दिनेश कार्तिकने सहकारी आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अखेरचं हस्तांदोलन केलं. तसेच उपस्थित चाहत्यांचं हात दाखवून आभार मानले. यावेळेस दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. कार्तिकच्या या निर्णयाला आता कुठे 2 दिवस होत नाहीत, तोवर आयसीसीने दिनेश कार्तिककडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमानंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 2 जूनपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेकडे असणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी असणार आहेत. पाकिस्तानचा अपवाद वगळता उर्वरित 19 जणांनी आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसीकडूनही स्पर्धेची जवळपास तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. त्यात आयसीसीने आता टी 20 वर्ल्ड कपसाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज समालोचकांसह दिनेश कार्तिकही दिसणार आहे.

आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रमुख समालोचकांसह दिग्गज क्रिकेटपटूही समालोचन करणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप विजेते महिला आणि पुरुष खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दिनेश कार्तिक, कार्ल्स ब्रेथवेट, स्टीव्हन स्मिथ, एरॉन फिंच, एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, सैमुअल बद्री आणि लिसा स्थळेकर यांचा समावेश आहे. क्रिकेट चाहत्यांना या दिग्गजांकडून कॉमेंट्रीच्या माध्यमातून सखोल विश्लेषण जाणून घेता येणार आहे. तसेच मुख्य समालोचकांमध्ये एकूण 6 पैकी 2 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये रवी शास्त्री, हर्षा भोगले, नासिर हुसैन, इयन बिशॉप, इयन स्मिथ आणि मेल जोन्स हे आहेत.

दिनेश कार्तिकची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान टी 20 वर्ल्ड कपसाठी समालोचक म्हणून निवड होताच दिनेश कार्तिकने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपण या स्पर्धेसाठी उत्सूक असल्याचं कार्तिकने म्हटलंय. आयीसीसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “ही स्पर्धा फार महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे ही स्पर्धा फार रोमांचक होणार आहे. 20 संघ 55 सामने आणि नवीन ठिकाण. ही एक उत्कंठावर्धक स्पर्धा होमार आहे. मी या स्पर्धेसाठी उत्सूक आहे”, असं कार्तिक म्हटलं.

टी 20 वर्ल्ड कपसाठी समालोचकांची नाव

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने