Driving licence: १ जूनपासून पासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल; सरकारकडून लागू केला नवा नियम; जाणून घ्या काय बदललं?

 

ब्युरो टीम : ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) मिळविणे हे सोपे काम नाही. या परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रियांतून जावे लागते.

चाचणीसाठी आरटीओमध्ये तासन् तास लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही.

त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.

नवीन नियमांनुसार स्थळानुरूप ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल. 

अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. वाहनमालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल आणि वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.

खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे अतिरिक्त दोन एकर जमीन आवश्यक आहे.

वाहनचालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सुविधा खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षकांसाठी पात्रता : प्रशिक्षकांकडे किमान हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित मूलभूत गोष्टी परिचित असल्या पाहिजेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने