ब्युरो टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर, रेसिडेन्शिअल हायस्कूल, शेवगाव येथील विद्यार्थीनी कु. समीक्षा योगेश रासने हि 99.40 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. संस्कृत व गणित विषयांत 100 पैकी 100 गुण आणि इंग्रजी विषयात 100 पैकी 94 गुण प्राप्त होऊन या 3 विषयांत देखील विद्यालयात प्रथम क्रमांक मिळाला.
वडिल श्री. योगेश रासने एस. टी. महामंडळ शेवगाव डेपो याठिकाणी हेल्पर व आई सौ. सुवर्णा योगेश रासने गृहिणी आहे. समिक्षाने अत्यंत बिकट परिस्थितीत देखील अशा प्रकारचे घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.
रेसिडेन्शिअल हायस्कूल, शेवगाव येथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी देखील तिचे कौतुक केले आणि तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. शेषराव देशपांडे सर (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे तिला मार्गदर्शन लाभले. शेवगाव - पाथर्डी मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती. मोनिकाताई राजळे यांनी देखील तिचे कौतुक केले. तसेच, शेवगाव येथील स्वाध्यायी परिवार, कासार समाज यांनी देखील तिचे अभिनंदन करुन कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा