Gautam Gambhir: गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक; क्रिकेट विश्वात चर्चांना उधान

 

ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमात गौतम गंभीर याने आपल्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सला तब्बल 10 ट्रॉफी जिंकून दिली. केकेआरने याआधी गंभीरच्या नेतृत्वात 2014 साली आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. गंभीरने केकेआर टीममध्ये मेंटॉर म्हणून प्रवेश करताच एका झटक्यातच इतिहास रचला. त्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी 27 मे शेवटची मुदत होती. त्यानंतर आता गौतम गंभीरच हेड कोच असल्याची घोषणा होणं बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

क्रिकबझच्या एका रिपोर्ट्सनुसार, एका आयपीएल फ्रँचायजीच्या मालकाने गौतम गंभीर हाच टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती दिली आहे. गंभीरला हेड कोच करण्याबाबत बीसीसीआयची एक बैठक पार पडल्याचंही म्हटलं जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत लवकरच बहुप्रतिक्षित घोषणा केली जाऊ शकते. मात्र अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने