India-Nepal Relation : मालदीव आणखी एक देश भारतासोबत पंगा घेण्याच्या तयारीत ; कारण पहा

 

ब्युरो टीम : भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यानंतर आणखी एक देश भारतासोबत पंगा घेण्याच्या तयारीत आहे. नेपाळेने शुक्रवारी 100 रुपयांच्या नवीन नोटा छापणार असल्याचे सांगितले आहे. ही घोषणा करत असताना त्यांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे त्या नोटेवर तो नेपाळची नकाशा छापणार आहे. नेपाळ नोटा छापणार याबाबत भारताला कोणतीही अडचण नाही पण तो त्या नकाशात भारताचा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी दर्शविणारा नकाशा छापणार आहे. हे भारतासाठी आक्षेपार्ह आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत नेपाळ सरकारचे प्रवक्ते आणि माहिती व दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी ही माहिती दिली.

नेपाळ नोटेवर छापणार नकाशा

नेपाळचा नवा नकाशा १०० रुपयांच्या नोटेमध्ये छापण्याचा निर्णय नेपाळचे अध्यक्ष यांच्यासोबतच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी हा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. पण ते भारताचा भाग आहेत.

रेखा शर्मा पुढे म्हणाल्या की, “25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100 रुपयांच्या नोटेचे रीडिझाइन आणि जुना नकाशा बदलण्यास मंजुरी दिली आहे.” नेपाळच्या या निर्णयावर भारताकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याआधी नेपाळने एकतर्फी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपला प्रदेश म्हणून घोषित केले होते.

नेपाळने २०२० मध्ये नवा नकाशा केला अपडेट

18 जून 2020 रोजी, नेपाळने आपल्या संविधानात सुधारणा करून लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या तीन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांचा समावेश करून देशाचा राजकीय नकाशा अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावर भारताने प्रतिक्रिया दिली होती. भारताने याचे वर्णन “एकतर्फी कृती” असे केले होते. नेपाळकडून प्रादेशिक दाव्यांची ‘कृत्रिम वाढ’ टिकाऊ नसल्याचं भारताने म्हटले होते.

लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या प्रदेशांवर भारताचे नियंत्रण आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या तिन्ही क्षेत्र भारताकडे आहेत. भारताची नेपाळशी 1850 किलोमीटरहून अधिक सीमा लागून आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार ही पाच राज्ये नेपाळच्या सीमेवर आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने