ब्युरो टीम : IPL 2024 चा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सीजनमधील हा सर्वात मोठा सामना आहे. चेन्नईची टीम फायनलमध्ये पोहोचली, तर विचारायलाच नको. पण चेन्नईची टीम फायनलमध्ये तेव्हाच पोहोचेल, जेव्हा ते प्लेऑफमध्ये दाखल होतील. त्यासाठी फायनलआधी त्यांना या सीजनमधील सर्वात मोठा सामना खेळावा लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध हा सामना होईल. RCB ने या सीजनमध्ये जबरदस्त कमबॅक केलय. RCB च्या प्लेऑफच्या अपेक्षा त्यांच्याच स्वत:च्या बंगळुरुच्या हवामानावर अवलंबून आहेत.
शनिवार 18 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर प्लेऑफची चौथी टीम ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्स या बाबतीत मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण त्यांच्याकडे आधीच 14 पॉइंट्स आहे. त्याचवेळी बंगळुरुकडे 12 पॉइंट्स आहेत. चेन्नईला पुढच्या राऊंडमध्ये दाखल होण्यासाठी आता फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. बंगळुरुच्या टीमला फक्त विजयच नकोय, तर एका ठराविक फरकाने चेन्नईला हरवाव लागेल. म्हणून बंगळुरुने त्या फरकाने विजय मिळवला नाही, तर पराभूत होऊनही CSK प्लेऑफसाठी क्वालिफाय होईल.
RCB फॅन्सचे आकाशाकडे लागले डोळे
बंगळुरुला कमीत कमी 18 धावांचा फरक किंवा 11 चेंडू राखून चेन्नईला हरवाव लागेल. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट CSK पेक्षा जास्त होईल व ते प्लेऑफमध्ये जातील. बंगळुरुने मागच्या 5 सामन्यात जो फॉर्म दाखवलाय, त्यावरुन हे अशक्य वाटत नाही. पण मैदानापेक्षा पण त्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत. भारतीय हवामान विभागाने इशारा दिलाय की, दक्षिणी कर्नाटकमध्ये 18 ते 20 मे रोजी मुसळधार पाऊस कोसळेल. म्हणून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
….तर CSK प्लेऑफमध्ये जाईल
मॅच 18 मे म्हणजे आज आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर पाऊस या सामन्यात व्यत्यय आणेल. अशा स्थितीत पाऊस या सामन्यावर पाणी फिरवू शकतो किंवा ओव्हर कपात होऊ शकते. अशा स्थितीत कोणाचा किती फायदा होणार आणि किती नुकसान हा प्रश्न आहे. चेन्नईसाठी पाऊस कोसळण चांगलं राहील, कारण त्यामुळे मॅचच रद्द होईल. दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट मिळेल आणि CSK प्लेऑफमध्ये जाईल. तेच बंगळुरुच आव्हान संपुष्टात येईल.
प्लेऑफसाठी RCB ला हे करावच लागेल
आता दुसरा प्रश्न हा आहे की, पावसामुळे ओव्हरकपात झाली, तर RCB ला विजयासाठी काय कराव लागेल?. काहीही झालं, पहिली बॅटिंग केली तर RCB ला 18 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी CSK वर विजय मिळवावा लागेल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 11 चेंडू राखूनच विजय मिळवावा लागेल. मग सामना किती ओव्हरचा असो.
टिप्पणी पोस्ट करा