IPL 2025 : आयपीएल 2025 साठी होणार मोठे बदल ; बीसीसीआय नवीन पद्धत अमलात आणणार ?

 

ब्युरो टीम : आयपीएल 2025 स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली. पुढच्या दहा महिन्यांच्या कालावधीत बरेच मोठे बदल होणार आहेत. आयपीएलच्या 18व्या पर्वापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे फ्रेंचायसींना किती प्लेयर्स रिटेन करायचे आणि किती रिलीज करायचे याबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. सध्यातरी फ्रेंचायसींना चार खेळाडू रिटेन करण्याची मुभा आहे. त्यामुळे फ्रेंचायसीची खेळाडू निवडण्यासाठी दमछाक होणार आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात खेळाडू इतर संघात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. मेगा लिलावात काही खेळाडूंना जबर भाव मिळण्याची शक्यता आहे.  आयपीएल इतिहासात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 24.75 कोटी खर्च करून कोलकात्याने घेतला आहे. आता हा विक्रम मेगा लिलावात कोण मोडतं? याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे आयपीएल स्पर्धेत एकूण 10 आणखी सामन्यांची भर पडणार आहे. आगामी आयपीएलमध्ये 74 ऐवजी एकूण 84 सामने होतील. आयपीएल 2025 आणि 2026 मध्ये हे 84 सामने खेळवले जातील. त्यानंतरही 2027 मध्ये ही संख्या 94 पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच 2027 मध्ये ही स्पर्धा लीग स्वरुपात होईल. सध्या आयपीएल स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने होते.

आयपीएल 2021 मध्ये एकूण 60 सामने झाले. यात 56 साखळी फेरीचे सामने आणि 4 प्लेऑफच्या लढती झाल्या. यावेळी प्रत्येक संघांना एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. सर्व संघांनी एकूण 14 सामने खेळेले. 2022 मध्ये दोन संघांची भर पडली आणि आयपीएलचं आयोजन राउंड रॉबिन पद्धतीने करण्यात आलं. आयपीएल 2025 आणि 2026 मध्येही असाच फॉर्मेट सुरु ठेवला जाईल. पण आयपीएल 2027 बीसीसीआयने लीग पद्धतीने आयोजित करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच सर्व संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील.

आयपीएल 2027 मध्ये कोणताही गट नसेल. त्याऐवजी एक संघ उर्वरित 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. म्हणजेच एका संघाच्या वाटेला 18 सामने येतील. असे साखळी टप्प्यात 90 सामने खेळवले जातील. दुसरीकडे, येत्या पर्वात प्लेऑफ पॅटर्नमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पहिला क्वॉलिफायर, एलिमिनेटर, दुसरा क्वॉलिफायर आणि अंतिम सामना आयोजित केला जाईल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने