ब्युरो टीम : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असं ते म्हणाले. परभणीतून आपणच निवडून येणार असून मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वतःच्या झोपडीत राहून मालक होणं चांगलं
महादेव जानकर म्हणाले की, बारामती शहराने 2014 साली माझ्यावर आणखी जरा प्रेम केलं असत मी पवारांना हरवलं असतं. तेव्हा तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचल नव्हतं, वेळही मिळाला नव्हता. अनेकजण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलं आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढणार नाही. मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेण.
दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करतोय असं महादेव जानकर म्हणाले.
बारामतीच्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं की कमळावर लढ, पण मी त्याला नकार दिला होता असं महादेव जानकर म्हणाले. आता ही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हवर मी दिल्लीत जाणार असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा