ब्युरो टीम : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हळहळू आपली भूमिका स्पष्ट करत आहे. नारायणगड येथे होणारी सभा रद्द होण्याची कारणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. नारायण गडावर काहीही तयारी नव्हती, शिवाय पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता सभा स्थगित केली आहे. पुढील सभेची तारीख कळविली जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारकडून सगे सोयाऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर राज्यातील सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री होणार का? आणि त्या सरकारचे मंत्रिमंडळ कसे असणार? यावर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली.
मोदी साहेबांना गोदड्या घेऊन यावे लागणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगे सोयाऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभा निवडणूक लढविणार आहे. सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित करून ही निवडणूक लढणार आहे. मराठा एक झाला आणि मोदी साहेबांना महाराष्ट्रात गोदड्या घेऊन यावे लागणार आहे. चार-पाच नेत्यांमुळे मोदी साहेबांवर ही वेळ येणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या पक्षाला बहुमत मिळाले तरी त्यानंतर ते मुख्यमंत्री होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्याला मंत्रिपद देणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री होण्याच्या लफड्यात मला पडायचे नाही. मात्र मी गेम करणार आहे. राज्यात सात ते आठ उपमुख्यमंत्री करणार आहे. तसेच शेतकऱ्याला मंत्रिपद देणार आहे. मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही. निवडणूक संपले की हे गुरगुर करत आहेत. मला धमक्या दिल्या, मात्र मी तक्रार देणार नाही. आम्ही एवढे कच्चे नाहीत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबाना माझं एकच सांगणं आहे. मला राजकारण करायचं नाही. तुम्ही तुमच्या लोकांना शांत बसावा. कोणीही आमच्या विरोधात बोलण्यास लावू नका.
प्रकाश आंबडेकर, मनोज जरांगे सोबत असणार
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांची युती होणार का? त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी संकेत दिले. ते म्हणाले, आम्ही सोबत आहेत की नाही हे वेळ आल्यावर सांगणार आहे. आताच सांगणार नाही. आता माझी प्रकृती चांगली आहे. कोणीही रुग्णालयात येवू नये. प्रकृती ठीक झाल्यावर मी उपोषण सुरू करणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा