रेल्वेच्या मेगा ब्लॉक (Mega Block) मुळे प्रवाश्यांचे हाल

 


    ब्युरो टीम : ठाणे येथे फलाट रुंद करण्यासाठी 63 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पासुन मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेच्या वापरकर्त्यांना विलंब आणि गर्दीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेल्या मेगाब्लॉकमुळे सीआरच्या मुख्य कॉरिडॉरवरील उपनगरीय सेवेवर परिणाम झाला असून, कार्यालयात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे.

    ठाणे स्थानकातील फलाट 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी नियोजित ब्लॉकमुळे प्रवाशांना खचाखच भरलेल्या लोकल गाड्या आणि प्रमुख स्थानकांवर गर्दीचा सामना करावा लागला. ब्लॉकमुळे शुक्रवारी किमान सहा लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 161 लोकल सेवा रद्द केल्या आहेत असे सीआर ने आधीच जाहीर केले. विलंब आणि गर्दीचा अंदाज घेऊन, रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना अत्यावश्यक नसल्यास उपनगरीय रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

    रेल्वे अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले होते  किंवा ब्लॉक कालावधीत त्यांना वाहतुकीची पर्यायी साधने उपलब्ध करून द्यावीत, तसेच राज्य आणि महापालिका परिवहन संस्थांना जादा बस चालवण्यास देखील आवाहन केले होते तरी देखील आज प्रवाश्यांचे बरेच हाल झाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने