Nagar : रौप्य (२५ व्या ) वर्ष्यानंतर नगर तालुक्यातील वडगांव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

 

ब्युरो टीम : ज्ञानसरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, वडगांव गुप्ता,  ता. जि. अहमदनगर या  शाळेतील १९९९ बॅच च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी चा स्नेह मेळावा आज दि. १९/५/२०२४ रोजी  तब्बल पंचविस वर्षानंतर पडला.  या निमित्त सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांची उपस्थिती होती. त्यानिमित्त सर्व गुरुजन वर्ग व विदयार्थि यांनी २५ वर्षा पुर्वीच्या आठवणींना उजाळा दिला, या मेळावा निमित्त माजी  विद्यार्थ्यानी  तर्फे शाळेला एक इंट्रक्टिव्ह बोर्ड डिजिटल क्लास साठी भेट देण्यात आला. सर्व गुरुजनांचा एक झाड, फुलगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्या समेवत झाड लावण्यात आले . 

२५ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. सर्वाना एक स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर अजबे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानसरिता माध्यमिक विद्यालय चे अध्यक्ष यांनी भूषवले. या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कानडे सर आणि माजी आजी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी लहू टकले, तुषार कवडे, संतोष दिवटे, नितीन कराळे, रतन गव्हाणे आदींनी मेहनत घेतली. 









0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने