Narendra Modi : यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेत ध्यानाला बसणार? आराम निवडणुकीनंतर ध्यानधारण करण्यावर त्यांचा भर

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणूक 2024 अंतिम टप्प्यावर आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान 1 जून रोजी होईल. 2014, 2019 प्रमाणे यावेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला. निवडणूक सभा घेतल्या. दिवसाला त्यांनी 4-4 जनसभांना संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची रॅली 30 मे रोजी होणार आहे. याच दिवशी शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार थांबणार आहे. रॅलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूला जातील. रात्री आराम केल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला जातील. तिथे विवेकानंद रॉक मेमोरियलवर ध्यानाला बसू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता पंजाब होशियारपुर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करतील. त्यानंतर तामिळनाडूचा कार्यक्रम आहे. तिथे रात्री आराम करतील. पंतप्रधान मोदी यांच्या 31 मे आणि 1 जून अधिकृत कार्यक्रमांची घोषणा झालेली नाही. 2019 लोकसभा निवडणुकीत अंतिम टप्प्याच मतदान झाल्यानंतर पीएम मोदी केदारनाथ येथील रुद्र गुफेत ध्यानासाठी गेले होते.

तिथे भव्य स्मारक झालं

स्वामी विवेकानंद 1893 साली विश्व धर्म सभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत शिकागो येथे गेले होते. तिथे त्यांनी भाषण दिलेलं. संपूर्ण जगात हे भाषण गाजलेलं. आजही त्यांच्या भाषणाची चर्चा होते. त्या यात्रेआधी स्वामी विवेकानंद 24 डिसेंबर 1892 साली कन्याकुमारीला आले होते. त्यावेळी समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर समुद्रात एक विशाल शिळा दिसलेली. स्वामी विवेकानंद पोहत तिथे गेले व ध्यानाला बसले. 1970 साली या शिलेजवळ स्वामी विवेकानंद यांना समर्पित भव्या स्मारक उभारण्यात आलं. यात चार मंडप आहेत. येथे 4 फूट उंचीच्या प्लॅटफॉर्मवर स्वामी विवेकानंदांची मोठी मुर्ती स्थापित करण्यात आली होती. या मुर्तीची उंची 8 फूट आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने