ब्युरो टीम : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असुन यात काही मुर्ती आढळल्या आहेत.
यातील काही मुर्ती भग्न अवस्थेत आहे तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे. विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला होता. पुरातत्व विभागामार्फत पाहणी केली असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागातर्फे सांगण्यात आले.
एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे काही वस्तू आढळल्या असुन दगडाच्या मुर्त्या सापडल्या आहेत. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा