Pankaja Munde : पदाची अपेक्षा नाही ; मला फक्त वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचंय- पंकजा मुंडे

 

ब्युरो टीम : "आपला समाज रस्त्यावर आणून त्याच्यावर राजकारण करण्याचे संस्कार माझे नाहीत. मला कुठलीही प्रतिष्ठा नको. कुठलं पद नको. माझा बाप अचानक निघून गेला त्याच स्वप्न मला पूर्ण करायचं आहे", असे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या. नाशिकमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. 

भारतीताई माझी बहिण तिला निवडून द्या

पंकजा मुंडे म्हणाल्या, चहाच्या टपरीत काम करणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो आणि  संविधान आहे म्हणूनच हे होऊ शकतं. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता देशाचा विकास होईल हे सुद्धा मोदी नेहमी म्हणतात. आजची सभा रात्री 12:30 वाजता ठरली. मोदींचं एक मत वाढत असेल तर त्यांचा विजय करण्यासाठी आम्ही कधीही कुठेही जायला तयार आहोत. भारतीताई माझी बहिण तिला निवडून द्या, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं. 

मी बाबा बाबा करते याचा काही जणांना पोटशुळ होतो

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जीनची पॅन्ट घातलेला सुद्धा शेतकरी असावा. त्यांच चांगलं काम व्हावं हीच माझी इच्छा आहे. मी बाबा बाबा करते याचा काही जणांना पोटशुळ होतो. माझ्या बाबांचं शेवटपर्यंत नाव घेणार आहे. माझे पिता म्हणून नव्हे तर माझे नेता म्हणून त्यांचं नाव मी कायम घेणार आहे. आधी नाशिकला यायला सात आठ तास लागायचे मात्र आता समृद्धी महामार्गामुळे लवकर आले. 

प्रधानमंत्री म्हणून नव्हे तर प्रधानसेवक म्हणून मोदीजी काम करतात

काय विकस केला म्हणणाऱ्या विरोधकांनी फक्त जातीच राजकरण केलं. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं मात्र शौचालय बांधू शकले नाहीत. महिलांना देखील उघड्यावर जावं लागत होते. मात्र 2014 नंतर मोदींनी या कामाला प्राधान्य दिलं. प्रधानमंत्री म्हणून नव्हे तर प्रधानसेवक म्हणून मोदीजी काम करतात. पाच वर्ष कोणत्याही संविधानिक पदावर नसतानाही तुम्ही आज माझ्यावर प्रेम करतात हेच माझं काम आहे. तुम्ही माझी कॉलर टाइट केली आहे. उदयनराजे सारखी कॉलर उडवता येत नाही, मात्र माझा गमच्या उडूवून मी मान्य करते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 







0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने