ब्युरो टीम : नगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट (आय बी एम आर डी) येथील प्रा. डॉ. नचिकेत देवधर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयासाठी पीएचडी संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील, सचिव डॉ. पांडुरंग गायकवाड, मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. अभिजित दिवटे आणि आय बी एम आर डी संस्थेचे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा