ब्युरो टीम: पुणे विद्यापीठातील बंद करण्यात आलेली जीम लवकरात लवकर सुरु करावी यासाठी विद्यार्थी नेतृत्व राहुल ससाणे यांच्या नेतृत्वाखली विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने मा. कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी व खेळाडूंना व्यायाम व सराव करण्यासाठी ज्या काही जीम आहेत. त्यामधील जीम क्रमांक - २ ( शुटींग रेंज इमारत येथील) मध्ये विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करत होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अचानक संबंधित जीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जीम बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी व खेळाडूंचे नुकसान होत आहे. या जीममध्ये विद्यापीठांमधील विविध विभागांतील विद्यार्थीं तसेच राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व्यायाम व सराव करत होते. जीम बंद झाल्यामुळे या सर्वांचे शारीरिक व मानसिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थी व खेळाडूंनी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत मा. कुलगुरू यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
कुलगुरू महोदय यांनी या प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंध जीम तात्काळ सुरू करावी. अशी मागणी आम्ही करतो आहोत. अन्यथा तसे न झाल्यास सर्व विद्यार्थी व खेळाडूंना घेऊन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय विद्यार्थीं काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
विद्यापीठ प्रशासनास आमची विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांची अडचण व मागणी लक्षात घेऊन तात्काळ जीम चालू करावी. म्हणजे विद्यार्थी व खेळाडूंना व्यायाम व सराव करता येईल. आणि त्यांचे नुकसान होणार नाही.
- राहुल ससाणे ( विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती )
टिप्पणी पोस्ट करा