Rohit Pawar : रोहित पवारांनी दिले काकांना आव्हान ; म्हणाले अजित पवारांनी प्रचारासाठी भाजपच्या 'या' नेत्याला आणावे


ब्युरो टीम : बारामती लोकसभा मतदारसंघाता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दौंड तालुक्यात महाविकास आघाडीची आज सभा होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची जाहीर सभा होतेय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर हे नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना संबोधित केलं. तेव्हा बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

अजित पवारांना आव्हान

आमचं कुटुंब फोडलं. आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण शरद पवारसाहेबांनी राज्यात 54 सभा घेतल्या. अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल. तुम्हाला येऊन धमक्या देत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

अजित पवार जर तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. मग लोकांना वाटत आहे की तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार? ऊसाची चिंता करू नका. एकाचही ऊस मी शिल्लक ठेवणार नाही… उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कपणे उभे राहतील. तुम्ही अडचणीत होतात म्हणून सोडलं. मलाही एखादं पद भेटलं असतं. कारवाई झाली नसती पण गेलो नाही. आपण सर्व साहेबांसोबत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

“शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप लढाई”

सुप्रियाताईंना तिसऱ्यांदा खासदार करायचं आहे. ही निवडणूक आपण सर्व भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केलं? सामन्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने