ब्युरो टीम : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी संगीत सिवन यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत सिवन आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. संगीत सिवन यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले होते. रितेश देशमुख देखील मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सध्या त्यांचे स्मशानभूमीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
रिपोर्टनुसार, संगीत सिवन यांच्या निधनाची माहिती मिळताच सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. रितेश देशमुख यांनी देखील सोशल मीडियावर संगीत सिवन यांच्यासोबत खास फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. रितेश देशमुख यांच्या पोस्टवर देखील चाहते कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत.
संगीत सिवन यांच्यासाठी भावना व्यक्त करत रितेश देशमुख म्हणाले, ‘संगीत सिवन आता या जगात नाहीत ऐकून मी हैराण झालो. एक नवा कलाकार असल्यामुळे कोणी तरी आपल्यावर विश्वास ठेवणारा असायला हवा आणि त्यांनी तुम्हाला काम दिलं पाहिजे.. ‘क्या कूल है हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ सिनेमासाठी संगीत सिवन यांचे आभार व्यक्त करु शकत नाही..’ असं देखील अभिनेता म्हणाला.
हिंदी आणि मल्याळम सिनेमा जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन आता आपल्यात नाहीत. ‘यमला पगला दीवाना-2’, ‘क्या कूल हैं हम’,’अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन संगीत सिवन यांनी केलं आहे. आता त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
संगीत सिवन यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. पण संगीत सिवन यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. संगीत सिवन यांचं निधन का आणि कसं झालं यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टिप्पणी पोस्ट करा