Shivajirao adhalrao : शिरूर लोकसभेत राजकीय वातावरण पेटले; आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेवर टीका

 

ब्युरो टीम : बिनकामाच्या माणसाने मागच्या काही दिवसात करामती केल्यात. शिरूरमध्ये बोलले ही निवडणूक विकास कामावर बोलण्याची नाही. अमोल कोल्हे काहीही बोलून फक्त आरोप करत आहेत. तुमच्याकडे निवडणुकीत मुद्दे राहिले नाहीत. बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी मी न्यायालयात लढलो. मी अनेक ठिकाणी बैलगाडा घाट बांधून दिले. मी बैलगाडा सुरू व्हावेत यासाठी 7 आंदोलने केली. माझ्यवर 3 गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे मला पासपोर्ट मिळत नाही आणि अमोल कोल्हे यांच्यावर एक गुन्हा नाही. बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि अमोल कोल्हे नाटकातील घोड घेवून दावडीच्या घाटात आला. अरे बैलगाडा घाटातील घोडीवर कोल्हेंनी बसून दाखवावं, असं म्हणत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

अमोल कोल्हेंवर निशाणा

अमोल कोल्हेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी सर्वाधिक प्रश्न संरक्षण खात्याचे विचारले, असा आरोप ते करतात. याचं संरक्षण खात्याचे प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळेंचे ही नाव आहे. उगाच कोल्हेना काहीही बोलायची सवय लागलेली आहे.अनेक वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पोट भरलं. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी काय करावं हे कोल्हे यांना कळलं नाही, अशा शब्दात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.

कोपरे मांडवे हे गाव दत्तक घेतलं. जे गाव दत्तक घेतल त्याच गावाची अवस्था बिकट आहे. निवडणूक दिलं कोल्हेंना आणि त्या गावात पाण्याची व्यवस्था मी करतोय. माझ्यासह संरक्षण खात्याचे प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारले, असंही शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

आढळराव पाटलांचं आवाहन काय?

तीन वेळा खासदार झालो, हे माझ्यासाठी खूप झालं. शिवसेनेचे आमदार नसतानाही मी खासदार झालो. आता बस करावं, थांबावं असा मी निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं आणि 2024 लोकसभेची तयारी करा. अशा मला सूचना दिल्या. पण कालांतराने समीकरणं बदलली आणि ही जागा राष्ट्रवादीला गेली. मग महायुतीने मला तिकीट द्यायचं ठरवलं अन् मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. माझी शेवटची निवडणूक, मला संधी द्या, असं आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने