surykumar Yadav : टी20 वर्ल्डकप कायम डोक्यात ; सूर्यकुमार यादवने गुपित उघड केले स्पर्धेचे गुपित

 

ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा सराव देखील सुरु आहे. फलंदाज सूर्यकुमार यादवने या बाबतची माहिती दिली आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर त्याला कॉमेंट्री पॅनेलने अनेक प्रश्न विचारलं. यावेळी टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबतही सांगितलं. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, टी20 वर्ल्डकप डोक्यात आहे. तसेच यासाठी खास तयारी करत असल्याचं सांगितलं. यासाठी दुपारी सराव करत आहे. मैदानात उपस्थित असलेल्या अनंत त्यागी, पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी सूर्यकुमार यादववर प्रश्नांचा भडीमार केला. टी20 वर्ल्डकपसाठी कशी तयारी सुरु आहे? असा प्रश्न त्यांनी सूर्यकुमार यादवला विचारला. यानंतर सूर्यकुमार यादवने गुपित उघड केलं आहे.

“सध्या आम्ही आयपीएल खेळत असलो तरी कुठे ना कुठे आमच्या डोक्याक टी20 वर्ल्डकप सुरु आहे. टी20 वर्ल्डकपसाठी तयारीही करत आहे. यासाठी दुपारी ग्राऊंडवर जाऊन सराव करत आहे.” असं सूर्यकुमार यादवने सांगितलं. “या मागचं कारण म्हणजे अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये सामने दिवसा खेळवले जाणार आहे. यासाठी मी दिवसाही बॅटिंग करत आहे. कारण आतापासून सवय लागून जाईल. तेथे गेल्यावर एकदम नवीन काही वाटणार नाही.”, असंही सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने रात्री खेळवले जातात. त्यामुळे दिवसा होणाऱ्या सामन्यात खेळाडूंना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव दिवसाचं औचित्य साधून सराव करत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवची सेंच्युरी खऱ्या अर्थाने टीम इंडियाला बुस्टर देणारी आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे. तर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडाशी सामना होणार आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 रंगत अनुभवता येणार आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान




   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने