ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या मोसमानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेकडे लागलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी 2 तुकड्यांमध्ये अमेरिकेत जाणार आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी ही अमेरिकेत 27 मे रोजी दाखल झाली. तर लवकरच दुसरी तुकडी दाखल होणार आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
आयर्लंड क्रिकेट टीमचे हेड कोच हेनरिक मलान यांनी 2 वर्षांच्या मुदतवाढी ग्रीन सिग्लन दिला आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी आयर्लंड क्रिकेट टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. मलान हे आता 2027 च्या मध्यापर्यंत आयर्लंडची धुरा सांभाळणार आहेत. आयर्लंडला आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 च्या हिशोबाने कामगिरी सुधारण्याची जबाबदारी ही आता मलान यांच्या खांद्यावर असणार आहे. मलानने जानेवारी 2022 रोजी पहिल्यांदा हेड कोच म्हणून आयर्लंडची क्रिकेट टीमची जबाबदारी स्वीकारली होती. आयर्लंड क्रिकेटने 4 जानेवारीला याबाबतची माहिती दिली होती. तेव्हा 3 वर्षांचा करार झाला होता. मलानची ग्राहम फोर्ड यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती.
हेनरिक मलान यांचा होकार, आयर्लंड क्रिकेट टीमला मोठा दिलासा
दरम्यान बीसीसीआयही टीम इंडियासाठी हेड कोचच्या प्रतिक्षेत आहेत. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन जाहीरात प्रसिद्ध करत मुख्य प्रशिक्षक या पदासाठी अर्ज मागवले होते. या पदासाठी अर्ज करण्याची 27 मे ही अखेरची तारीख आहे.
आयर्लंडच्या टी 20 वर्ल्ड कप 2024 चं वेळापत्रक
विरुद्ध टीम इंडिया, न्यूयॉर्क, 5 जून.
विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क, 7 जून.
विरुद्ध यूएसएए, फ्लोरिडा, 14 जून.
विरुद्ध पाकिस्तान, फ्लोरिडा, 16 जून.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
टिप्पणी पोस्ट करा