Angarki Sankashti Chaturthi : ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात गणेशभक्तांची दर्शनासाठी रीघ, पाहा VIDEO



विक्रम बनकर, नगर  : आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण गणरायाला साकडं घालतो. तसेच सर्व देवतांच्या आधी गणरायाला पुजतो. त्यामुळेच लाखो भक्तजनांचे आणि नगरकरांचे आराध्य दैवत असलेल्या अहिल्यानगर (अहमदनगर) येथील ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. 

प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण बाप्पाला साकडे घालून करतो. सर्व देवतांच्या आधी त्याला पूजतो. म्हणूनच गणरायाला आराध्य दैवत मानले जाते. वर्षभरात गणपती बाप्पासाठी काही व्रत आवर्जून पाळले जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणरायाची विशेष पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रतही महत्त्वाचे असते. कारण वर्षभरात जितक्या चतुर्थी असतात, त्यापैकी अंगारकी चतुर्थीचे वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळेच आज ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती.

आज पहाटे पासूनच गणरायाच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. मंदिरामध्ये आज विधिवत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यासर्व कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद गणेशभक्तांचा मिळाला. तसेच मंदिरामध्येही अंगारीका चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. दरम्यान, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. 

पाहा VIDEO

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने