BJP President : RSS मुख्यालयात खलबतं सुरु ; भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नवे चर्चेत

 

ब्युरो टीम : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे अजून काही दिवस पदावर विराजमान असू शकतात. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत एक पर्याय समोर येत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष न बदलण्याचा प्रस्ताव भाजपसमोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निकालाने भाजपला मोठा धक्का दिला. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मोठी परीक्षा असेल. त्यामुळे नवीन अध्यक्षांच्या निवडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत अजून एक पर्याय समोर येत आहे.

नियम सांगतो काय?

नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेपी नड्डा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडावे लागणार हे निश्चित मानण्यात येत आहे. भाजपच्या घटनेनुसार, एक व्यक्ती केवले एका पदावर असू शकतो. त्यामुळे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जेपी नड्डा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडावे लागू शकते.

पण भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी संबंधित सूत्रांनी या प्रकरणात नवीन ट्विस्ट आणला आहे. त्यांच्यानुसार, पक्ष कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती करु शकतो. तोपर्यंत जेपी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. कार्यकारी अध्यक्षाविषयी अजून निर्णय झालेला नाही. तोपर्यंत नड्डा हेच मंत्रायासह पक्षाचे पण काम पाहतील.

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

जे. पी. नड्डा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नड्डा यांना मोदी सरकारमध्ये आरोग्य मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्याकडे हेच काते होते. त्यांना पुन्हा कॅबिनेटची संधी देण्यात आल्यानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे.

नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात निवडणूक

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या जाऊ शकतात. अर्थात याविषयीची निश्चित माहिती अद्याप हाती आलेली नाही.

अनुराग ठाकूर यांचे नाव आघाडीवर

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्पर्धेत इतर अनेक नावे मागे पडली आहे. या निवडणुकीत अनुराग ठाकूर यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार होता. युवक आणि क्रीडा खात्याची जबाबदारी पण त्यांच्या खांद्यावर होती. त्यांना मोदी सरकारच्या नवीन कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने