Bollywood : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील कलाकार झाली ट्रोल ; अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला

 

ब्युरो टीम : झी मराठीवरच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी तुम्हाला आठवते का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती वेगवेगळे रील्स आणि फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटो आणि व्हीडिओंना नेटकरी पसंती देताना दिसतात. तिचं प्रचंड कौतुक केलं जातं. मात्र सध्या नेटकरी मायराला ट्रोल करताना पाहायला मिळतात. मायराने पावसात एक रील शूट केलं. यावरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. डोक्यात जाणारी मुलगी, असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

काय आहे हे रील?

पुष्पा 2 या सिनेमातील ‘सोसेटी’ हे गाणं सध्या प्रचंड ट्रेंड होतंय. या गाण्यावर कलाकारापासून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि नेटकऱ्यांनी रील्स केले आहेतं. याच ‘सोसेटी’ गाण्यावर मायरा वायकुळ हिनेही रील केलं आहे. नुकतंच पावसाळा सुरु झालाय. पहिल्या पावसाचा आनंद घेत मायरा ‘सोसेटी’ या गाण्यावर रील केलं. तिचं हे रील चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या रीलला पसंती दिलीय.

मायरा वायकुळ ट्रोल

मायरा वायकुळ हिचं हे रील चाहत्यांना आवडलं आहे. मायरा कुठे गेली आहे गावी गेलीस का? पाऊस पडतोय तिकडे छान… खूप छान झालंय रील, अशा कमेंट चाहत्यांनी म्हटलं आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. डोक्यात जाणारी मुलगी, असं एका नेटकऱ्याने केली आहे. वयापेक्षा मोठी झालेली मुलं किशोरवयात प्रेशरमध्ये असल्याचं फिल करतात, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. वयापेक्षा मोठी होत आहे. अभ्यासाकडे लक्ष दे… अश्या रील्स करण्यात टाईमपास करून काही होणार नाही. ही तर नखरे करण्यात पटाईत आहे, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

नेटकऱ्यांचा पालकांवर निशाणा

काही नेटकऱ्यांनी मायराच्या पालकांनाही सुनावलं आहे. Shamelss parents! या मुलीला अश्लील गाण्यांवर नाचायला लावतात. काय वय आणि काय धिंगाणा… लहान पोरीच्या कमाईवर खाणारे पालक… लाज वाटू द्या जरा थोडी तरी…, अशी कंमेट नेटकऱ्याने केली आहे. पैशांसाठी मुलीला रील करायला लावणाऱ्या पालकांना गणपती बाप्पा शिक्षा कर, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

दरम्यान, काही दिवसांआधी मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं. असं ट्रोल केल्याने लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो, असं गौरव वायकुळ म्हणाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने