Breaking News : १८ जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय



ब्युरो टीम : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून काल, मंगळवारी (१८ जून २०२४) रोजी घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अर्थात युजीसीला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C)कडून परीक्षे संदर्भात काही गंभीर इनपुट मिळाले होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार UGC-NETची नव्याने परीक्षा घेतली जाईल. याबाबतची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्याच बरोबर या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने