Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीत चुकीचे नरेटिव्ह सेट केला; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाना

 

ब्युरो टीम : देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य केले. त्यांनी पराभवाची कारणे देखील सांगितली. ते म्हणाले की, चुकीचे नरेटिव्ह तयार करण्यात आले. पण हे मुद्दे जास्त काळ टिकत नाही. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे होता. आता महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. उद्योग पळवले असा खोटा आरोप केला गेला. पण गुजरात, कर्नाटक पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली.

ठाणे-कोकणात ठाकरेंचा पराभव – फडणवीस

उद्धव ठाकरे यांना ठाणे आणि कोकणात एकही जागा मिळाली नाही. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या ते कोणाच्या भरवणार मिळाल्या. मराठी माणसांनी मत दिले नाहीत. मराठी मतांनी त्यांना मतदान केलं असतं तर चांगला लीड मिळायला पाहिजे होता. मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. एका विशिष्ट समाजाच्या आधारावर ते निवडून आले. त्यांनी त्याची कबुली पण दिली. मुस्लीम समाजामुळे निवडून आल्याचं त्यांनी म्हटलंय.

ज्या जागा भाजप हारलीये त्या खूप कमी टक्के मतांनी हारलोय. आपण कुठून हारलो हे सगळ्यांच्या लक्षात आले असेल. मालेगाव मध्य मध्ये १ लाख ९४ मतांचा त्यांना लीड मिळाला. भाजपच्या ११ जागा या ५ टक्के पेक्षा कमी मतांना हारलो.

जर त्यांना ३१ जागा मिळाल्या तर ते विधानसभेत ही रिफ्लेक्ट झाला पाहिजे. विधानसभा जागांवर आपल्याला ७१ जागांवर आघाडी आहे. महायुतीला ७६ मतदारसंघामध्ये आपल्याला आघाडी आहे. जनतेने नंबर एकची पार्टी भाजपलाच ठेवले आहे.

प्रवक्त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे – फडणवीस

आपल्याला काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसलेला आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे. आपली मदत मित्रपक्षांना झाली आहे. मित्रपक्षांची मदत आपल्याला मिळाली आहे. प्रवक्त्यांनी समजून बोलले पाहिजे. तटकरे निवडून आले. सगळ्यांनी काम केले. एकमेकांना सोबत घेऊन चालणं महत्त्वाचं आहे. विधानसभेत हे बदलणं कठीण नाहीये. ताकदीने आपण पुढे गेलो तर आपल्याला ३ टक्के मतांची गरज आहे. तीन टक्के मते मिळाली तरी आपण विधानसभा जिंकतो.

नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होताय. १० वर्ष हा ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है असं ते म्हणाले. सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझावर दाखवला त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. मी कामाला लागलो आहे. कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने