Diabetes Patients : डायबिटीजच्या रुग्णांनी आंबा खावा का? वाचा

 


ब्युरो टीम : सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. बाजारामध्येही हापूस, बदाम, केशर अशा विविध प्रकारचे आंबे येत आहे. फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा खाण्यासाठी खूपच चविष्ट असतो. आरोग्यासाठीही तो फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, डायबिटीज अर्थात मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाणे आरोग्याच्या दृष्टिनं फायदेशीर आहे किंवा नाही ते? चला तर आज याबाबतच जाणून घेऊ.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सीफायबरपोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक शुगरमुळे तो योग्य प्रमाणात खाणे केव्हाही चांगले. पण मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चला तर, आज याबाबतच आपण जाणून घेऊ.

आंब्यामध्ये असणारी नैसर्गिक साखर ही नेहमीच्या साखरेपेक्षा आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे. मात्र, शुगर किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंबा अतिशय योग्य प्रमाणात खावा. विशेषत: ज्यांची शुगर लेव्हल हाय असते, त्यांनी आंबा खाताना काळजी घ्यावी. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आंबा खाण्यास मनाई नाहीपण तो खाण्याचं प्रमाण योग्य हवे. तुम्ही आंबा कापून त्याच्या फोडी खाऊ शकता. मात्र, मँगो शेक किंवा ज्यूस पिणं टाळा, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

रोग प्रतिकारशक्ती वाढेल

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. आंबा खाल्यानं विविध आजारांचा धोका कमी होतो.

दरम्यान, आंबा हा आरोग्याच्यादृष्टिनं फायदेशीर असला तरी तो खाण्याचे प्रमाण योग्य हवे. त्यातही मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाताना विशेष काळजी घेण्ंनी आंबा खाताना विशेष काळजी घेणाना वियाची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने