Drink Tea : भरपावसात चहाचा आस्वाद घ्या, पण त्यासोबत 'हे' पदार्थ टाळा



ब्युरो टीम : सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस सुरू आहे. पाऊस आणि चहा यांचे एक वेगळेच नातं आहे. पावसात चहा पिण्याचे मजा काही औरच. पण तुम्हाला माहिती आहे का, चहा पिताना त्यासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे. 

चहा पिताना अनेकांना सोबत काहीतरी खाण्यासाठी लागते. परंतु तुम्हाला माहितीये का, काही पदार्थ असे आहेत, जे चहासोबत खाल्ल्यानं ते शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरतात.  चला तर, चहासोबत नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, हे जाणून घेऊ. 

लिंबाचा रस 

चहा पिण्यापूर्वी किंवा नंतर लगेच लिंबाचा रस पिऊ नका. त्यामुळे पोटाला सूज येऊ शकते. हे मिश्रण टाळणे फायद्याचे आहे.

पराठा 

चहा सोबत पराठा तुम्ही सुद्धा अनेकदा खाल्ला असेल. पण काहीजणांना चहा व पराठा एकत्र खाण्यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते. तसेच चहा सोबत थंड पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही.

भजी, पकोडा नकोच

चहा आणि भजी, बेसन वडा, पकोडे असे अनेक जण आवडीनं खातात. परंतु त्याचे नियमित सेवन केल्यानं आतड्यातील मायक्रोबायोमला त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा सोबत बेसनापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.

लोहयुक्त भाज्या टाळा

चहासोबत लोहयुक्त भाज्या खाल्यानं शरीरातील लोहाचे शोषण हे मर्यादित होते. चहासोबत भाज्यांचे सेवन केल्यानं, भाज्यांपासून शरीराला मिळणारे आरोग्यदायी फायदे मिळत नाही.

हळद , दही खाऊ नका

चहासोबत हळदीचं सेवन कधी करू नका. कारण यामध्ये असलेले टॅनिन पोट खराब करू शकतात. तसेच दही किंवा दह्यापासून बनवलेला कोणत्याही पदार्थाचे चहा सोबत किंवा चहा घेतल्यानंतर लगेच सेवन करू नका.  चहा आणि दही एकत्र घेतल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने