Gaurav Bapat : पुणे लोकसभेच्या विजयाचे श्रेय घेण्यावरून भाजपचे दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या मुलाने सुनावले खडे बोल

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रविंद्रं धंगेकर याचा पराभव केला होता. मात्र पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी अंतर्गत कुरघोडी असल्याचं दिसत आहे. भाजपचे दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी पुण्यात लागलेल्या बॅनरवर टीका करताना फेसबुक पोस्ट करत खडेबोल सुनावले आहेत.

गौरव बापट काय म्हणाले?

निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखांच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे, आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची अहमहमिका शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटत असल्याचं गौरव बापट म्हणाले. या पोस्टची जोरदार चर्चा होऊ लागली असून त्यांचा कोणावर रोख होता का? अशी पोस्ट का केली? याबाबत टीव्ही9 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आजची फेसबुक पोस्ट केली त्यामागचा रोख हा कोणा एका व्यक्तीवर, गटावर किंवा संघटनेवर नाही. विजयाचं श्रेय लाटण्याच्या वृत्तीवर माझा रोख आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर पुणेकरांनी विश्वास दाखवला. विजय झाला आहे तो कार्यकर्त्यांचं आहे कारण या निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्ष शिवसैनिक, मनसे, पतीत पावन संघटन असे सगळे लोक एकत्रित काम करत होते. त्यामुळे हे श्रेय या मित्रपक्षांसह तळागातील कार्यकर्त्यांचं असल्याचं गौरव बापट म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात गौरव बापट यांचे वडील गिरीश बापट हे दोनवेळा आमदार आणि एकदा खासदार होते. 29 मार्च 2023 मध्ये  गिरीश बापट यांचे पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले. कसबा मतदार संघात पोटनिवडुकीत त्यांनी आजारी असतानाही प्रचार केला होता. भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यंदा पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यांच्याविरूद्ध रविंद्र धंगेकर यांनी निवडणुक लढवली होती. मोहोळ यांन या निवडणुकीत विजय मिळवल्यावर त्यांना केंद्राकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने