Health Tips : तुमच्या घरामध्ये सतत एसी चालू असतो? मग हे वाचाच

 


ब्युरो टीम : आजकाल घरामध्ये एसीचा वापर वाढला आहे. उकाड्यापासून सुटका मिळवायची असेल, किंवा थंडीच्या दिवसात घरामध्ये ठराविक तापमान ठेवायचे असेल, तरीही एसीचा वापर केला जातो. अनेकजण वर्षातील बारा महिने एसीचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एसीचा अधिक वापर करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

वेबएमडीनुसार, जेव्हा तुम्ही सतत एसी सुरू ठेवता, तेव्हा व्हेंटिलेशनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. योग्य व्हेंटिलेशन नसेल तर एसीमुळे खोकला, सर्दी किंवा इतर आजार होऊ शकतात. यासाठी वेळोवेळी एसी फिल्टर बदलणे, घराच्या खिडक्या उघडणे, ताजी हवा घरात येऊ देणे आवश्यक आहे. तसेच जेव्हा तुम्ही तासनतास एसी सुरू ठेवता, तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेला ओलावा नाहीसा होऊ लागतो, त्यामुळे त्वचा आणि शरीर वेगानं डिहायड्रेट होऊ लागतं. त्वचा कोरडी पडते व जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा चक्कर येण्यासारख्या समस्या सुरू होतात.

डोकेदुखी, अ‍ॅलर्जीची शक्यता

जर तुमच्या एसीची सर्व्हिसिंग करण्यात आली नसेलव तुह्मी जेथे काम करता तिथे विविध जीवाणू असतील, तर तेथील सेंटर एसीमुळे तुह्मी अ‍ॅलर्जीचे शिकार होऊ शकता. एसी हा मायक्रोबियल अ‍ॅलर्जीचे कारण होऊ शकतो.  याशिवाय तुम्हाला एसीमध्ये झोपायला आवडत असले तरी त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.  जेव्हा तुमचा एसी फिल्टर अस्वच्छ होतेतेव्हा तो ट्रिगर होत असतो.  तुम्ही एसीमध्ये जास्त काळ राहिल्यास तुमची उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होऊ लागत. अशावेळी एसीमधून बाहेर पडताच तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.

दरम्यान, घरामध्ये योग्य तापमान राहावे, यासाठी एसीचा वापर करण्यात येत असला तरी तो वापरताना काळजीही घेण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने