Human Health : तुळस एक, आरोग्यासाठी फायदे अनेक

 


ब्युरो टीम :  धार्मिक मान्यतेनुसार घरासमोर तुळस लावणे खूप शुभ मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या आरोग्यासाठी तुळस खूप फायदेशीर आहे. दररोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानं आरोग्याच्यादृष्टीनं विविध फायदे मिळतात. चला तर, आज आपण तुळशीच्या पानाच सेवन केल्यानं कोणकोणते फायदे होतात, ते जाणून घेऊ.

तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे तुळशीच्या पानांचा चहामध्ये समावेश करणेहा आहे. तुम्ही तुमचं आरोग्य चांगल राहण्यासाठी या मार्गाचा वापर नक्की करू शकता. कारण चहामध्ये तुळशीची पाने टाकल्यानं त्याची चव आणि सुगंध दोन्ही वाढते. दररोज चहामध्ये तुळशीची पाने टाकणं सोयीस्कर व्हावे, यासाठी ती वाळवून ठेवणे फायद्याचं ठरते. तुळशीची पाने वाळवल्यानंतर त्याची तुम्ही पावडर करू शकता, व ही पावडर दररोज चहा करताना त्यामध्ये टाकू शकता. परंतु जर तुम्हाला पावडर करणे शक्य नसेल, तर अशावेळी तुम्ही वाळलेली तुळशीची पाने ही चहाच्या पत्तीमध्ये टाकू शकता. अशा प्रकारे वर्षभर तुम्ही कोणत्याही स्वरुपात तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.

घरच्याघरी बनवा तुळशीच्या पानांची पावडर

तुळशीच्या पानांची पावडर अनेकजण बाजारातून विकत आणतात, व ती चहासाठी वापरतात. पण तुम्ही घरच्याघरी तुळशीच्या पानांची पावडर अगदी सहज बनवून ती वर्षभर साठवून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची गरज नाही. अवघ्या काही तासांमध्ये तुळशीच्या पानांची पावडर तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुळशीची पाने तोडा. ही पाने तोडताना ती देठापासून तोडली जातील, याची काळजी घ्या. यानंतर पाने वाळवून त्यात थोडे पाणी घाला. उन्हामध्ये पाने सुखल्यानंतर त्याची पावडर तयार करून ती एका डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता. ही पावडर चहा करताना त्यामध्ये टाकल्यास चहाला सुगंध तर येतोच, शिवाय चहाची चव सुद्धा अधिक चांगली होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने