ब्युरो टीम : टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीतील अजून हायव्होल्टेज सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या तुफानी फटकेबाजीसह भारताने १२ षटकात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. एकट्या रोहित शर्माने ९२ धावा केल्या आहेत. १२ व्या षटकात रोहित शर्मा आऊट झाला. पण त्याने २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्याचा एक प्रकारे बदला घेतलाय. दरम्यान, भारताने जर हा सामना जिंकला तर संघ थेट सेमीफायनलमध्ये धडकणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुपर८ सामना सुरू आहे. हा हाय-व्होल्टेज सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाच्या रथावर स्वार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत त्याने सलग पाच सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यावर टीम इंडियाची नजर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठी ही ‘करो किंवा मरो’ असा हा सामना आहे. सुपर८ फेरीत ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. कांगारू संघाला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. गट-१ च्या गुणतालिकेत भारत अव्वल आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
टिप्पणी पोस्ट करा