IND vs PAK: भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय



ब्युरो टीम : भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर ६ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार रविवारी (९ जून २०२४) रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्र उलटल्यानंतरच संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या.

भारतीय गोलंदाजांच्या अखेरच्या षटकांतील भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील फलंदाजीसाठी अवघड असलेल्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर तगडी फलंदाजी फळी असलेला भारतीय संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला. बुमराहच्या १५व्या षटकापासून गोलंदाजांनी पाकिस्तानला एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. तर बुमराहने १९व्या षटकात इफ्तिखार अहमदची विकेट घेत पाकिस्तान संघावर मोठा दवाब टाकला. तर अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनेही विकेट घेतली. अवघ्या ११९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध चित्तथरारक विजय मिळवला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या या विजयासह भारताचे २ सामन्यात ४ गुण झाले आहेत. मात्र पाकिस्तानसाठी हा पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने