Kangna Ranaut : धक्कादायक! महिला सुरक्षा रक्षकाने विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावली



ब्युरो टीम :  भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला सुरक्षा रक्षकानं कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 


कंगना ही चंदीगड विमानतळावरुन दिल्लीकडं निघाली होती. त्यावेळी सिक्युरिटी चेक दरम्यान तिथल्या एका महिला सुरक्षा रक्षकानं तिच्या कानशिलात लगावली. कंगनाच्या पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांबाबत केलेल्या या विधानाचा राग मनात असल्यानचं सीआयएसएफच्या त्या महिला सुरक्षा रक्षकाला कंगनाला विमानतळावर बघताच राग अनावर झाला आणि तिनं कंगनाच्या कानशिलात लगावल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, आता याबाबत कंगनाचे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करीत स्पष्टीकरण दिले आहे. 


व्हिडिओमध्ये कंगनाने नेमकं काय म्हंटले आहे?

सोशल मीडिया पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्येय कंगनानं म्हटलं आहे की, ‘मला मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून अनेक फोन कॉल्स आले आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आज चंदीगड विमानतळावर जी घटना घडली ती सिक्युरिटी चेकदरम्यान घडली. जेव्हा मी तपासणीनंतर पुढे निघाले तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये एक सीआयएसएफची महिला सुरक्षा रक्षक होती, तिनं मला पुढे जाऊ दिलं आणि माझ्या चेहऱ्यावर चापट मारली आणि शिवीगाळ केली. यानंतर मी त्या महिलेला विचारलं की त्यांनी असं का केलं? तर तिनं सांगितंल की, शेतकरी आंदोलनाची ती समर्थक आहे. पण मला काळीज याची वाटतेय की, पंजाबमध्ये जो दहशतवाद वाढतो आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीनं हाताळणार आहात?’

दरम्यान, आता या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने