आज लोकसभेचे 7 व्या टप्यातील मतदान पार पडले. गेल्या दोन महिन्यात एकूण 7 टप्यात झालेल्या लोकसभेच्या मतदाना नंतर विविध तज्ञांच्या विश्लेषणावर आधारित तसेच मतदारांच्या सॅम्पल सर्वेचा आधार घेऊन आम्ही आमचा अंदाज (Exit Poll) वाचकांच्या खास आग्रहास्तव घेऊन आलो आहोत. Exit Poll च्या अंदाजानुसार येत्या 4 तारखेला भाजप/एनडीए पुन्हा एकदा सत्तेत परतत आहे.
भाजप एकूण 334 (अधिक किंवा उणे 12 जागा) जागांसह आघाडीवर राहणार असून, NDA आघाडीच्या 384 (अधिक किंवा उणे 15 जागा) जागा निवडुन येण्याचा अंदाज आहे. काँग्रेस पार्टी 55 (अधिक किंवा उणे 11 जागा) यावर विजय मिळवेल आमच्या अंदाजानुसार काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत 66 जागा पार करणार नाही आणि 45 जागांच्या खाली जाणार नाही. I.N.D.I. अलायन्स ही 115 जागा (अधिक किंवा उणे 12 जागा). तर TMC, BJD, YSRCP, AIADMK, AIUDF, AIMIM, आणि आणखी काही लहान पक्षांसह इतरांना 35-40 जागा मिळतील असा अंदाज आहे.
भाजप व मित्र पक्षाला 40 ते 42 टक्के मते मिळतील असा अंदाज असून. INDI अलायन्स 35% च्या आसपास मते मिळविल. BSP चा व्होटशेअर 2.5% किंवा त्याहून कमी होत आहे. SP, AAP, TDP, RJD या सर्वांच्या मतांची टक्केवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढनार आहे. तसेच SP वगळता त्यांच्या जागांची संख्या देखील वाढेल. राष्ट्रवादीची एकत्रित संख्या (NCP + NCP -SP) गेल्या वेळेपेक्षा चांगली असेल, परंतु SS (SHINDE) यांच्या हाती निराशा येण्याची शक्यता आहे. DMK, TMC, NCP, SS, VBC, LEFT, BJD, YSRCP, BRS, JDS, JDU, AGP आणि आणखी काही लहान पक्ष 2019 च्या तुलनेत त्यांची मत टक्केवारी व जागा कमी होतील असा आमचा अंदाज आहे.
टिप्पणी पोस्ट करा