Maharashtra Rain : आज घराच्या बाहेर पडायचे आहे? मग हवामान विभागानं दिलेला पावसाचा हा अंदाज वाचाच



ब्युरो टीम : आज (१० जून २०२४) तुम्ही कामानिमित्त घराच्या बाहेर पडत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागांनं वर्तवली आहे. हवामान विभागानं मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे.  पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडलाय.  मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागांने वर्तवली आहे.

हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी गर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी तुरळक पवासाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी  पाऊस पडण्याची शक्यता आहे.  रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात  मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने