Maharashtra Rain : मुसळधार पाऊस सुरू आहे? वीज पडतेय... काय कराल?



ब्युरो टीम : राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत वीज पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते.  वादळीवारा आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व विजेपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विजा चमकत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. चला तर, या याबाबत जाणून घेऊ.

घरात असताना...

- वातावरणातील बदल पाहून वादळाचा किंवा अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज असेल, तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा

- घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा

- घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलित यंत्र बंद ठेवा

- विजेवर चालणाऱ्या वस्तू बंद ठेवा

- घराचे दरवाजे, खिडक्या, कुंपण यापासून दूर राहा

घराबाहेर असताना...

- त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) जा

- ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यापासून दूर राहा

- गाडी चालवत असल्यास सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करा

- मोठ्या झाडापासून गाडी लांब पार्क करा

- जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा

- मोकळ्या, तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहा

- जंगलात असल्यास दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्या

- मोकळ्या जागेवर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावेत व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे

हे लक्षात ठेवा

- मोबाइल, वायरद्वारे जोडले गेलेले फोन व इतर इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नयेत

- वादळ सुरू असताना व विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका

- धातूची दारे, लोखंडी खिडक्या, वायरिंग, लोखंडी नळ यांच्याशी संपर्क टाळावा

घराबाहेर असताना असे राहा सतर्क

- मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना, वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका

- वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा

- अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून लांब राहा

वीज पडल्यास हे कराः

- त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा.

- वज्रघात बाधित व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्या.

- ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा, जेणेकरून हायपोरमीयाचा (शरीराचे अती कमी तापमान) धोका कमी होईल.

यांना करा संपर्कः

- आत्पकालिन परिस्थितीमध्ये जवळचे तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क करावा.

- रुग्णवाहिकेला टोल फ्री नंबर १०८ यावर संपर्क करावा.

- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला संपर्क करता येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने