Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, 'हा' आठवडा महत्वाचा



ब्युरो टीम : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून या आठवड्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सोमवार (२४ जून २०२४) सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर या भागात या आठवड्यात ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने या काळात वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.

दरम्यान, यंदा जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल झाला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून पावसाने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर सक्रिय झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने