Maharashtra Weather : मान्सून बरसणार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट



ब्युरो टीम :  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा आला आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर होण्याची शक्यता आहे. 

यंदा जूनच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने समाधानकारक व सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रारंभी एक-दोन दिवस तुरळक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले. बियाणे, अवजारे खरेदी करून काही ठिकाणी भातबियाणे पेरले. मात्र, आठ ते दहा दिवस उलटूनही दमदार पावसाची चिन्हे दिसत नसल्याने आता शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने गुरुवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर कुठे हलक्या सरींचा इशारा दिलाय. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबईत हवामान खात्याने पावासाचा यलो अलर्ट दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने