ब्युरो टीम : लग्नाळू असूनही तुमचं लग्न जुळत नाही? लग्नासाठी स्थळ येथे पण डोक्यावर अक्षदा पडण्याचा मुहूर्त काय जुळत नाही? अशा वेळी
वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काही वेळा कुंडलीतील दोषामुळे विवाह होत नाही किंवा विवाहाला उशीर होतो. हे दोष नेमके काय आहेत, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
आजकाल लग्नाला उशीर होणं किंवा लग्नच न होणं, या समस्येनं अनेकजण त्रस्त आहेत. पण लग्नाला उशीर का होतो? एखादी व्यक्ती अविवाहित का राहते? हे कुंडलीत तयार होणाऱ्या ग्रहांच्या योगावर आधारित असते. आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे. 'मराठी प्रिंट'सोबत बोलताना ज्योतिषाचार्य संदीप कुलकर्णी (MA - Astrology) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लग्न न जुळण्यामागे कुंडलीत अशी असू शकते ग्रहस्थिती
1) शनी, बुध आणि शुक्र या तिन्ही ग्रहांची युती असेल, व यापैकी एक ग्रह दुर्बल राशीत असेल तर अशा व्यक्तीला लग्न करण्यात अजिबात रस नसतो.
2) कुंडलीतील ७ व्या घराचा स्वामी हा दुर्बल होऊन १२ व्या घरामध्ये असेल, व लग्न राशीचा स्वामी ७ व्या घरात असेल आणि त्यावर शनी ग्रहाची दृष्टी असेल, तर अशी व्यक्ती लग्न करण्यास नकार देतात.
3) चंद्र हा कुंडलीत शुक्रासोबत केंद्रस्थानी असेल, आणि मंगळ व शनीची युती होऊन या दोन ग्रहांपैकी कोणत्याही एक ग्रहाची चंद्र किंवा शुक्रावर दृष्टी असेल, तर अशा व्यक्तीचा विवाह होत नाही.
4) एखाद्या पुरुषाच्या कुंडलीत सातव्या घरात शनी व केतुची युती असेल, आणि शुक्र नीच राशीमध्ये किंवा आठव्या घरात असेल, तर अशा व्यक्तीचे लग्न होत नाही.
दरम्यान, ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीला खूपच महत्त्व आहे. कुंडली पाहूनच एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे राहू शकते, हे सांगता येऊ शकते, अशी मान्यता आहे. अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
टिप्पणी पोस्ट करा