Mla Election : माकपच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटोले यांची भेट; विधानसभा निवडणुकीवर चर्चा

 

ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात तीव्र होत असलेल्या शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या  तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे राज्य अध्यक्ष श्री. नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. 

आ. विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कऱ्हाड, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे, किरण गहला यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

लोकसभा निवडणुकीत दिलेल्या राज्यभरातील माकपच्या भरीव योगदानाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत माकपला किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात यासाठीचा प्रस्ताव आज माकपच्या वतीने त्यांना देण्यात आला. 

डहाणू, कळवण, नाशिक (पश्चिम), सोलापूर (मध्य) व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, यासह 12 विधानसभा मतदार संघ लढविण्याची जोरदार तयारी माकपने सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. मागील आठवड्यात मा. शरद पवार यांचीही माकपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. लवकरच मा.उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार आहे.

राज्यात दुधाचा व कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 28 जून पासून विविध संघटना या प्रश्नावर रणांगणात उतरत आहेत. राज्यातील आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार यांच्या प्रश्नांवरही माकप व जन संघटना रणांगणात उतरत आहेत. आगामी अधिवेशनात श्रमिकांचे हे प्रश्न केंद्रस्थानी  आणावेत असा आग्रहाची माकपच्या शिष्टमंडळाने यावेळी नाना पटोले यांच्याकडे लावून धरला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने