Narendra Modi : ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’, मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ



ब्युरो टीम : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून २०२४)  तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. 

रविवारी, नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचं सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देश- विदेशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. 

दरम्यान, अठराव्या लोकसभेचा निकाल हा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडासा वेगळा लागला आहे. या निवडणुकीत भाजपच्या ६३ जागा घटल्या आहेत. तर काँग्रेसच्या ४७ जागा वाढल्या आहेत. तरीही या निवडणुकीत एनडीए आघाडी ही इंडिया आघाडीवर सरस ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने