ब्युरो टीम : लोकसभेचा निकाल जाहीर होऊन अद्याप दोन दिवसांचा कालावधीही पूर्ण झाला नसतानाच नगर जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. याठिकाणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामध्ये निलेश लंके यांचा कट्टर समर्थक असणाऱ्या राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
झावरे यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, खासदार लंके यांनी झावरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच रुग्णालयातच माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके विजयी झाले आहेत. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये नगरमध्ये लंकेंच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाला. यावेळी माजी खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके समर्थक आमने सामने आले. त्यामध्ये लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या झावरे यांना उपचारासाठी सर्वात प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे खासदार लंके यांनी जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. तसेच तेथील डॉक्टरांना सूचना दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना लंके यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली आहे.
**
टिप्पणी पोस्ट करा