Patna-Jharkhand Train Fire : धक्कादायक! पाटणा-झारखंड पॅसेंजरच्या डब्यांना आग



ब्युरो टीम : पाटण्याहून जसीडीहला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण घटना घडली आहे. या ट्रेनमध्ये एका डब्याला आग लागली आहे. अवघ्यया काही मिनिटांमध्ये ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत गेली. अखेर डब्यातील प्रवाशांनी उड्या मारून आपले जीव वाचवले. या घटनेने दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे. किउल जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. रेल्वेच्या पथकाच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने