Police Recruitment : पोलीस भरतीच्या जागा १७ हजार ४७१ व अर्ज आलेत १७ लाख ७६ हजार २५६; या पदासाठी सर्वाधिक अर्ज

 

ब्युरो टीम : राज्यात उद्या बुधवार दि. 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रीया सुरु होणार आहे. राज्यभरातील लाखो उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून या पोलीस भरती 2024 पदांसाठी जोरदार सराव करीत आहेत. पोलिस भरती दरम्यान पाऊस आला तर दुसऱ्या तारखा जाहीर केल्या जातील असे सरकारने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात पोलिस भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला होता. त्याचाही फटका भाजपाला बसला असे म्हटले जाते. परंतू राज्यातील पोलिस भरती प्रक्रीयेची मैदानी चाचण्यांना सुरुवार उद्यापासून होत आहे. पोलिसांनी कोणत्याही आमीषाला बळी पडू नये, ही पोलिस भरती प्रक्रीया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही फुटेजच्या निगराणीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पोलिस भरतीत 17,471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. तर बँड्समन पदासाठी 41 जागा असून त्यासाठी 32,026 जणांनी अर्ज केले आहेत. तुरुंगविभागातील शिपाई ( प्रिझन कॉन्स्टेबल ) या पदाच्या 1800 जागांसाठी 3,72,354 अर्ज आल्याने एका जागेसाठी तब्बल 207 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. चालक पदासाठी 1,686 जागा असून त्यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक कॉन्स्टेबल पदाच्या 9,595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत. म्हणजे एका जागेसाठी 86 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने